
वैभववाडी : यंगस्टार क्रीडा मंडळ, वाभवे तांबेवाडी यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त मंगळवारी सत्यनारायण पूजा आयोजित करण्यात आली आहे. या पूजेच्या निमित्ताने पारंपरिक शक्ती-तुरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात शक्तीवाले संतोष माळकर विरुद्ध तुरेवाले सुकांत आयरे यांच्यात रंगतदार सामना होणार आहे.
पारंपरिक लोककलेचा जागर करणाऱ्या या कार्यक्रमाची गणेशभक्तांसह रसिकांना उत्सुकता लागली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ गणेशभक्तांनी घ्यावा, असे आवाहन यंगस्टार क्रीडा मंडळ, यांच्यावतीने करण्यात आले आहे.











