LIVE UPDATES

रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आडेलीत गणेश विसर्जन घाटाचे लोकार्पण

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 21, 2026 18:11 PM
views 86  views

वेंगुर्ला : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेंगुर्ला तालुक्यातील कांबळेवीर मांजरेकरवाडी, आडेली येथे नव्याने उभारण्यात आलेल्या गणेश विसर्जन घाटाचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. या उपक्रमामुळे गणेशोत्सव काळात गणेशमूर्ती विसर्जनासाठी ग्रामस्थांना अधिक सुरक्षित व सोयीस्कर सुविधा उपलब्ध होणार आहे.

या गणेश विसर्जन घाटाचे लोकार्पण वेंगुर्ला पंचायत समिती सदस्य तथा भाजप ओबीसी मोर्चा उपजिल्हाध्यक्ष नितीन मांजरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त हा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. स्थानिक पातळीवर आवश्यक असलेल्या सुविधांच्या उभारणीला चालना देत ग्रामस्थांच्या सोयीसाठी हा घाट उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

या कार्यक्रमाला तातू मांजरेकर, अशोक मांजरेकर, दीपक गोवेकर, सुधीर धुरी (ग्रामपंचायत सदस्य), सुहास मांजरेकर, गंगाधर गोवेकर, संजय मांजरेकर (माजी उपसरपंच, आडेली), दाजी मांजरेकर, उमाकांत गोवेकर, बाल्या मांजरेकर, सतीश मांजरेकर, पाटकर, दाजी पाटकर, योगेश खानोलकर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणेश विसर्जनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्याने कांबळेवीर मांजरेकरवाडी परिसरातील ग्रामस्थांसाठी हा घाट उपयुक्त ठरणार असून, आगामी काळातही अशा विविध लोकोपयोगी उपक्रमांना प्राधान्य देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.