LIVE UPDATES

वैश्यवाडा येथे २२ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 21, 2026 18:58 PM
views 17  views

सावंतवाडी : वैश्यवाडा श्री हनुमान मंदिर उत्सव समिती व राणी जानकीबाई वैद्यकीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गणेशोत्सवानिमित्त आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात मोफत डोळे तपासणी, रक्तातील साखर तपासणी, ब्लड प्रेशर तपासणी तसेच इतर आरोग्य विषयक तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत.

हे आरोग्य शिबिर उद्या 22 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत चालणार आहे. या शिबिरात भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदादीप चोडणकर, नेत्ररोग तज्ञ डॉ. विशाल पाटील तसेच इतर तज्ञ डॉक्टर रुग्ण तपासणी करणार आहेत. तरी या शिबिराचा वैश्यवाडा येथील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.