LIVE UPDATES

सेवाशक्ती संघटना अध्यक्ष सुधीर आडिवरेकर आक्रमक

आगार व्यवस्थापकांना धरलं धारेवर
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 12, 2026 12:06 PM
views 159  views

सावंतवाडी : भाजप प्रणित सेवाशक्ती संघटना सावंतवाडी आगार अध्यक्ष सुधीर आडिवरेकर यांनी आक्रमक पवित्रा घेत दोन दिवसात मार्ग फलक नवीन तयार करा, एनसीएमसी कार्डबाबत प्रवाशांची होत असलेली लूटमार थांबवा अशी मागणी केली. भाजप प्रणित शिवशक्ती संघटना सावंतवाडी आगारच्यावतीने आगारातील विविध प्रश्नाबाबत नोव्हेंबर 2025 मध्ये पत्रव्यवहार करून सुद्धा मागण्या पूर्ण न झाल्याने अध्यक्ष, नगरसेवक तथा सावंतवाडी भाजपा मंडळ अध्यक्ष सुधीर आडिवडेकर आक्रमक झाले. यावेळी सभापती आनंद नेवगी, सभापती प्रतीक बांदेकर,नगरसेवक ऍड. सिद्धार्थ भांबुरे, भाजपा पधादिकारी - दिलीप भालेकर, संतोष तळवणेकर, अमित गवंडळकर, पडते, पंकज टेमकर,नागेश जगताप आदी उपस्थित होते. 

श्री. आडिवरेकर यांनी आगार व्यवस्थापक यांना धारेवर धरले.  गाडीचे मार्ग फलक हे बोर्ड काडूने केले जात असताना आज प्रत्यक्ष गाडी समोर राहून ते आगार व्यवस्थापकांच्या निदर्शनात आणून दिले. तसेच सावंतवाडी मधील एनसीएमसी कार्ड एजन्सी वाले कार्डची किंमत 199 रुपये असून सुद्धा त्यापेक्षा जास्त पैसे आकारत होते. त्यासाठी प्रवासी वर्गाने  आडिवडेकर यांच्याकडे समस्या मांडली होती. त्यानुसार त्यांनी आगार  व्यवस्थापक यांना धारेवर धरत विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी आगर सचिव बाबू माणगावकर ,बी.जे तुळसकर, लक्ष्मण बरागडे, डी.व्ही गावडे ,एम एस शेख, हे देखील उपस्थित होते.