
सावंतवाडी : भटक्या कुत्र्यांचा सावंतवाडी शहरात उपद्रव वाढला असून नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नगरपरिषदेकडून आश्वासन देऊनही कार्यवाही होत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
बाजारपेठील शांतिनिकेतन, मच्छी मार्केट परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी येथून फिरण देखील मुश्किल झाले आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून केवळ आश्वासन न देता त्यावर तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. रात्रीच्या वेळी मोठ्या झुंडी फिरत असल्याने रस्त्यावरून चालण देखील मुश्किल बनल्याची नाराजी येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.











