
आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी मानले आभार
मालवण : जनतेच्या सेवेसाठी आमदार निलेश राणे तत्पर असल्याचे पुन्हा एकदा त्यांच्या कार्यातून सिद्ध झाले आहे. आमदार निलेश राणे यांच्या यशस्वी पाठवुराव्यातून मालवण ग्रामीण रुग्णालय येथे महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या आदेशाने दोन वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रशांत बागडे, बालरोग तज्ञ डॉ. वैशाली चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जनतेला आरोग्य सेवेच्या दृष्टीने अधिक सुखकर आणि तत्पर सेवा मिळावी या दृष्टीने यासाठी आमदार निलेश राणे सातत्याने प्रयत्नाशील राहिले आहेत. त्यांच्याच प्रयत्नातून आणि यशस्वी पाठपुराव्यातून मालवण ग्रामीण रुग्णालय येथे स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ नियुक्त झाले आहेत. याबाबत मालवण नगरपरिषद आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी आमदार निलेश राणे यांचे आभार मानले आहेत.
महायुती सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, खासदार नारायण राणे, आरोग्य मंत्री प्रकाश आंबीटकर, पालकमंत्री नितेश राणे तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत या सर्वांचेही सभापती पूनम चव्हाण यांनी आभार मानले आहेत.











