LIVE UPDATES

बीएचएमएस डॉक्टरांची एमएमसी मध्ये स्वतंत्र नोंदणीचे आदेश

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 04, 2026 10:34 AM
views 191  views
#kokansadlive#news update#konkan update#

सिंधुदुर्ग : सीसीएमपी अर्थात सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी पात्रता प्राप्त बीएचएमएस डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (एमएमसी) मध्ये स्वतंत्र नोंदणी सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने सोमवारी जारी केले. तसेच या डॉक्टरांच्या कार्यकक्षेची पात्रता, वैद्यकीय निष्काळजीपणाच्या प्रकरणांवरील कार्यपद्धती आणि नैतिक चौकट निश्चित करण्यासाठी सहा सदस्यीय समिती स्थापन करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

या निर्णयाच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र शाखेने मंगळवारी (ता. ४) सकाळी ६ ते बुधवारी (ता. ५) सकाळी ६ वाजेपर्यंत राज्यभर वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. सरकारने सोमवारी सायंकाळी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार एमएमसीने सीसीएमपी पात्र डॉक्टरांची स्वतंत्र नोंदणी सुरू करावी असे म्हटले आहे. सरकारच्या निर्णयानंतर आयएमए महाराष्ट्र, मार्ड, असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स (एएसएमआय) आणि विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या संघटनांनी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे.