LIVE UPDATES

वैभववाडीतील मुख्याध्यापक सुरेंद्र साळुंखे यांचा ‘गुरुसेवा पुरस्काराने सन्मान

Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: September 06, 2026 11:18 AM
views 111  views

सावंतवाडी : सोनाळी केंद्र शाळेचे मुख्याध्यापक सुरेंद्र साळुंखे यांची गुणवंत शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या ‘गुरुसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. सावंतवाडी येथील आमदार दीपक केसरकर मित्र मंडळाच्यावतीने गेली १३ वर्षे प्राथमिक, माध्यमिक व विशेष कार्य करणाऱ्या गुणवंत शिक्षकांचा ‘गुरुसेवा पुरस्कार’ देऊन सन्मान केला जातो. यंदाही शिक्षक दिनाचे औचित्य साधून पुरस्कार वितरण करण्यात आले.यामध्ये

वैभववाडी सोनाळी केंद्र शाळेचे मुख्याध्यापक सुरेंद्र सुधीर साळुंखे  यांची निवड करण्यात आली होती.त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे यावेळी कौतुक करण्यात आले.

पुरस्कारामध्ये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व शाल-श्रीफळ देऊन साळुंखे यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या या निवडीबद्दल सोनाळी केंद्र शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच वैभववाडी तालुक्यातील शिक्षणप्रेमींकडून अभिनंदन करण्यात येत आहे.