LIVE UPDATES

कोकण संस्थेकडून १ हजारहून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचं वाटप

Edited by: विनायाक गांवस
Published on: June 13, 2026 19:25 PM
views 30  views

सावंतवाडी : शिक्षण हीच सामाजिक परिवर्तनाची गुरुकिल्ली मानत कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्यावतीने श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथे भव्य शालेय साहित्य किट वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. नव्या शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १००० हून अधिक गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे किट वितरित करण्यात आले. या किटमध्ये दप्तर, वह्या, पेन, पेन्सिल, ज्योमेट्री बॉक्स, रंगसाहित्य तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचा समावेश होता. आर्थिक अडचणींमुळे शालेय साहित्य खरेदी करण्यात अडथळे येणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ झाला. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयीची आवड वाढावी, त्यांचा आत्मविश्वास बळकट व्हावा आणि त्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक सक्षम व्हावा, हा संस्थेचा मुख्य उद्देश असल्याचे मत संस्थाध्यक्ष दयानंद कुबल यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, सावंतवाडी नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले, कोकण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल, नर्मदा आई सहकारी संस्थेच्या अध्यक्षा संध्या तेरसे, माजी प्राचार्य अन्वर खान, सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे, सावंतवाडी पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, प्रा. रुपेश पाटील, कवी व साहित्यिक दीपक पाटेकर, अर्पिता वाटवे, वामन तर्पे, नगरसेवक तथा रोटरी क्लब सावंतवाडी अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ भांबुरे, मल्लसाम्राट प्रतिष्ठानचे सचिव ललित हरमलकर, तारा सांगळे, संस्था प्रतिनिधी सागर कुबल, रामचंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव, पंचायत समिती अधिकारी शोभराज शेर्लेकर, पत्रकार विनायक गांवस, भुवन नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे पदाधिकारी सुरज कदम, प्रथमेश सावंत, प्रीती पांगे, साक्षी पोटे, हर्षला कोल्हे, नूतन कदम, नव्या पाटील, सागर केवारी, अमोल गुरम, समीर शिर्के आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, पालकांच्या डोळ्यातील समाधान आणि समाजातील दातृत्वाच्या भावनेतून साकारलेला हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला. “एक किट, एक संधी आणि विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उचललेले एक महत्त्वाचे पाऊल” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.