LIVE UPDATES

ओटवणेत ओंकारचा वावर

Edited by: विनायाक गांवस
Published on: June 08, 2026 18:58 PM
views 33  views

सावंतवाडी : ओमकार हत्तीचा गेल्या काही दिवसांपासून इन्सुलीत वावर सुरू असून आता तो ओटवणेतील रस्त्यावर दिसून आला. रस्त्यावर मुक्त संचार करत असल्याने नागरिकही त्याला बघण्यासाठी गर्दी करत आहेत.

वनविभागाचे कर्मचारी देखील त्याच्या सोबत दिसत असून तो रस्त्यावर थांबू नये आणि गर्दीच्या दिशेने येऊ नये यासाठी कर्मचारी केळीचा वापर करत त्याला दूर नेण्याचे प्रयत्न करताना दिसत आहेत. ओमकारचा मुक्त संचार सुरू असल्याने नागरिकांमध्ये त्याला 'पाहण्यासाठी उत्सुकता वाढली आहे. नागरिक, युवक व लहान मुलांनी त्याला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली. अनेकांनी मोबाईलवर त्याचे फोटो व व्हिडीओ चित्रित केलेत.