LIVE UPDATES

मिठबावमध्ये ‘देऊळ बंद २’ चे दोन विशेष शो

भाई नरे यांच्या वाढदिवसानिमित्त रामेश्वर प्रतिष्ठानचा उपक्रम
Edited by: स्वप्नील लोके
Published on: June 08, 2026 19:14 PM
views 126  views

देवगड : रामेश्वर प्रतिष्ठान मिठबावचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत मिठबावचे सरपंच भाई नरे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार, दि. १० जून रोजी बहुचर्चित ‘देऊळ बंद २’ या मराठी चित्रपटाचे दोन विशेष शो आयोजित करण्यात आले आहेत.

दुपारी १ वाजता श्री रामेश्वर हायस्कूल, मिठबाव येथे तर रात्री ९ वाजता श्री स्वामी समर्थ मठ, मिठबाव येथे चित्रपटाचे प्रदर्शन होणार आहे. श्रद्धा, सामाजिक वास्तव आणि शेतकरी जीवनातील संघर्षावर प्रभावी भाष्य करणाऱ्या या चित्रपटाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत असून मिठबावमध्येही या प्रदर्शनाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. याच दिवशी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत श्री रामेश्वर हायस्कूल येथे रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. रामेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या उपक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.