LIVE UPDATES

ओटवणेत शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण

Edited by: विनायाक गांवस
Published on: June 06, 2026 10:55 AM
views 69  views

सावंतवाडी : तालुक्यातील ओटवणे गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पण सोहळा कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले. राज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला.

यामुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रसंगी माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे, पंचायत समिती सदस्य सौ. उत्कर्षा गावकर व अन्य मान्यवर तसेच शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.