
सावंतवाडी : दरवर्षी प्रमाणे यावर्षीही दहावी बाराविच्या परिक्षेत मराठा समाजाच्या मुलांना ७०टक्केच्यावर एकूण गुण मिळाले असतील अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन तर ज्या मुलांना ९० टक्के च्या वर गुण मिळाले असतील अशा मुलांचा शाल श्रीफळ सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तरी गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले नाव, मोबाईल नंबर, मार्क्सिस्ट ८४८४८२७९९३ व ७९७२६४८७८१ या मोबाईल नंबर वर पाठवून आपली नाव नोंदणी करावी असे आवाहन सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे.
गेली पाच वर्षे दहावी बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणार्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येतो व शिकण्याची जिद्द असणार्या गरजवंत गरजू १० मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते. दहावी बारावीच्या परीक्षेत ज्या मराठा समाजाच्या मुलांनी उज्वल यश संपादन केले आहे त्यांनी आपली नाव नोंदणी करावी सत्काराची तारीख नोंदणी पुर्ण झाल्यानंतर कळविण्यात येईल असे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.











