LIVE UPDATES

सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पतसंस्थांचा गौरव

Edited by: विनायाक गांवस
Published on: May 25, 2026 12:06 PM
views 42  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्यावतीने आंबोली येथील सैनिक स्कूलमध्ये दोन दिवसीय प्रशिक्षण मेळावा पार पडला. या मेळाव्यात सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पतसंस्थांचा गौरव माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यामध्ये सावंतवाडीच्या 'स्नेह नागरी सहकारी पतसंस्थेला' उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ, ॲड. दीपक पटवर्धन, जिल्हा उपनिबंधक श्री. शिंदे, सैनिक पतसंस्थेचे अध्यक्ष बाबुराव कविटकर आणि फेडरेशनचे उपाध्यक्ष जॉय डॉटस आदी उपस्थित होते. स्नेह नागरी' पतसंस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष अनंत उचगावकर, मुख्याधिकारी सौ. संगीता प्रभू, सौ. कोमल सावंत, कणकवलीच्या सहाय्यक शाखा अधिकारी सौ. सुप्रिया गोवेकर आणि कुडाळ शाखेच्या सौ. नेहा साळवी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.