
कणकवली: बाजारपेठेत रविवारी रात्री बाराच्या सुमारास नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या घराशेजारी असणाऱ्या महाडिक लेडीज टेलर या दुकानाला अचानक आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती समजतात अनेक युवकांनी व नागरिकांनी आग वीजवण्यासाठी धाव घेतली. धुराचे लोट संपूर्ण वरती छतापर्यंत वाढत जात होते, व आजूबाजूला दुकाने असल्याने मोठ्या प्रमाणात भीतीच वातावरण निर्माण झाले होते. पण अखेर युवा वर्ग व संस्थानिक नागरिकांच्या मदतीने आग नियंत्रण ठेवण्यात यश आले. नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी देखील घटनास्थळी पोहोचत मदत कार्य केले. आग लागण्याचे नेमके कारण समजू शकले नसले तरी शॉट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज स्थानिक नागरिक व्यक्त करत होते.

नगरपंचायतीचा अग्निशामक बंब तत्परतेने घटनास्थळी दाखल झाला होता. या घटनेमुळे बाजारपेठेत काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, सध्या मे महिन्याचा सीजन असल्याने महाडिक लेडीज टेलर्स या दुकानात मोठ्या प्रमाणात ड्रेस, साड्या, दप्तर, छत्री रेनकोट शिलाई मशीन विक्रीसाठी हे आणण्यात आले होते. हे सर्व साहित्य या आगीत जळून खाक झाले आहे तसेच फर्निचर वायरिंग इंटेरियर या सर्व वस्तूंचे देखील मोठे नुकसान झाले असल्यामुळे प्रसाद महाडिक यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.













