
सावंतवाडी : इन्सुलीमध्ये नदीतील गाळ उपसा करण्याच्या नावाखाली मोठेवाळूचे साठे ठेवण्यात आलेले आहे. परंतु, या ठिकाणचे तलाठी, मंडळ अधिकारी या गोष्टीकडे पूर्णता डोळे झाक करत आहेत. ही वाळू दिवसाढवळ्या लोकांना 20 ते २५ हजार रुपयांनी विकली जाते आणि त्याच्यातून कोट्यावधी रुपये कमावले जातात. सावंतवाडी तहसीलदार यांना याची पूर्वकल्पना असून देखील ते यासंदर्भात कारवाई करण्यास का टाळाटाळ करत आहे, असा आरोपही सामाजिक कार्यकर्ते अण्णा कुडव यांनी केला आहे.
या अवैध वाळूतून नदीतील गाळ उपसा करण्याच्या नावाने अनेक ठिकाणी गोटे जमा केलेले आहे. ते अनाधिकृतपणे लोकांना विकले जातात. त्यामुळे शासनाने याची गंभीर दखल न घेतल्यास सर्व पुराव्यासहित जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आपण मागणी करणार आहे असे श्री. कुडव यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.











