LIVE UPDATES

सावंतवाडीत योग शिबिराला प्रतिसाद

Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: November 01, 2026 05:52 PM
views 36  views

सावंतवाडी : शहरामधील जिमखाना हॉल येथे रविवार १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजता फिटनेस योग फाउंडेशन, महाराष्ट्र यांच्या मार्फत फॅट लॉस फिटनेस योग शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन सावंतवाडीच्या सभापती, नगरसेविका सौ. मोहिनी मडगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेविका सौ. सीमा नाईक, योगशिक्षक शेखर बांदेकर, फिटनेस किड्स अकॅडमी च्या कोषाध्यक्षा सौ. चैताली गवस, फिटनेस युवा अकॅडमीचे सचिव राजन राणे, जिल्हा योग प्रचारक श्री. सुधाकर मांजरेकर, फिटनेस युवा अकॅडमी चे सह सचिव श्री. महादेव सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

दीप प्रज्वलन झाल्यानंतर योग वर्ग घेण्यात आला. लठ्ठपणा म्हणजे आजच्या जीवनशैलीतील एक खूप मोठी गंभीर समस्या आहे आणि यावर मात करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, तरी सावंतवाडीतील सर्व जनतेने या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेविका मोहिनी मडगावकर यांनी केले. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शितल गावडे यांनी केले, प्रास्ताविक श्री. विशाल लातये यांनी केले तर आभार प्रदर्शन नारायण सावंत यांनी केले. आज शिबिराच्या पहिल्याच दिवशी अनेक नवीन योगाभ्यास प्रेमी या शिबिराचा लाभ घेण्यासाठी आले होते. सावंतवाडीतील या शिबिराचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.


ताजी बातमी

View all

आदित्य हळदणकर मित्रमंडळ - नाईक फिटनेस जिमच्या उपक्रमाचे संजू परबांकडून कौतुक
November 01, 2026
देवगड इथं 'मुक्तसंवाद'च्या आठव्या पुष्पात सायबर सुरक्षेवर जनजागृती
November 01, 2026
‘घर तेथे शोषखड्डा’ अभियानाला मिठबावमधून गती
November 01, 2026
वनराई बंधाऱ्यांमुळे सिंधुदुर्गात जलसंधारणाला हातभार : नारायण राणे
November 01, 2026
संबंधित बातम्या

View all

आदित्य हळदणकर मित्रमंडळ - नाईक फिटनेस जिमच्या उपक्रमाचे संजू परबांकडून कौतुक
November 01, 2026
देवगड इथं 'मुक्तसंवाद'च्या आठव्या पुष्पात सायबर सुरक्षेवर जनजागृती
November 01, 2026
‘घर तेथे शोषखड्डा’ अभियानाला मिठबावमधून गती
November 01, 2026
वनराई बंधाऱ्यांमुळे सिंधुदुर्गात जलसंधारणाला हातभार : नारायण राणे
November 01, 2026