
देवगड : उमाबाई बर्वे लायब्ररी, देवगड आणि तालुका पेन्शनर्स असोसिएशन, देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'मुक्तसंवाद' या उपक्रमाचे आठवे पुष्प उत्साहात संपन्न झाले. उमाबाई बर्वे लायबरी च्या स्नेहसंवर्धक मंडळाच्या सभागृहात शनिवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम झाला. यावेळी रत्नागिरी येथील सायबर क्राईम जनजागृती तज्ज्ञ *डॉ. अक्षय फाटक* यांनी 'सायबर क्राईम प्रतिबंध आणि सोशल मीडिया सुरक्षा अर्थात मोबाईलचा सुरक्षित वापर' या विषयावर श्रोत्यांशी मुक्तसंवाद साधला.
डॉ. फाटक यांनी सध्याच्या काळात वाढत असलेल्या ऑनलाईन फसवणूक, फेक कॉल, व्हॉट्सअॅप हॅकिंग, सोशल मीडियावरील फसव्या लिंक आणि बँक खात्याशी संबंधित सायबर गुन्ह्यांबाबत सविस्तर माहिती दिली. मोबाईल वापरताना घ्यावयाची काळजी, अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, OTP कोणालाही न देणे, सोशल मीडियावर प्रायव्हसी सेटिंग्ज कशा ठेवाव्यात याबाबत त्यांनी व्यावहारिक उदाहरणांसह मार्गदर्शन केले.तसेच गेल्या काही
बँक खात्याशी व सायबर गुन्ह्याच्या घटना देखील त्यांनी सविस्तर सांगितल्या.आपण बऱ्याच वेळा आधार, रेशन कार्ड, फोटो,बँक पासबुक झेरॉक्स, यासारख्या झेरॉक्स प्रति मागणी फॉर्म ला जोडतो.मात्र आपली ही सर्व माहिती सहज समोरच्याला देतो.त्या आधारे अनेक समस्या पुढे उभ्या राहतात.त्यासाठी त्वरित नजिकच्या सायबर गुन्हा शाखेशी संपर्क साधावा.बँक खात्याशी असलेले गुन्हे हे आपल्या कुटुंबात माहिती न सांगितल्याने जास्त करून घडतात.परिणामी बँक खात्यामधील लाखो रुपये काही मिनिटात गायब होतात.त्यासाठी आपण फसले गेलो आहोत हे वेळीच ओळखून अशा घटना भविष्यात कशा रोखता येथील हे पाहण्याची गरज असल्याचे डॉ अक्षय फाटक यांनी सांगितले.
यावेळी देवगड परिसरातील जेष्ठ नागरिक, लायब्ररीचे सभासद, वाचक आणि तरुण पुरुष व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. उपस्थित श्रोत्यांनी देखील शंका उपस्थित करून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ गणेश बांधकर तर आभार प्रदर्शन गुरुदेव परुळेकर यांनी केले.








