LIVE UPDATES

ब्लॅक फिल्म, फॅन्सी नंबर असलेल्या दोन वाहनांवर सावंतवाडी पोलिसांची कारवाई

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 29, 2026 20:11 PM
views 33  views

सावंतवाडी : चारचाकीला ब्लॅक फिल्म तसेच फॅन्सी नंबर लावून शहरातून फिरणाऱ्या दोन वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली असून त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. या कारवाईनंतर ब्लॅक फिल्म लावून फिरणाऱ्या अनेकांचे धाबे दणाणले आहेत. 

गुरुवारी येथील एका हॉटेलसमोर उभी असलेल्या चारचाकीला टोईंग करून ती सावंतवाडी पोलिस ठाण्यात नेण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी कार मालक पोलिस ठाण्यात आल्यानंतर त्याला अडीच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

तर सावंतवाडी शहरातही कोलगाव येथील एका कारला फॅन्सी नंबर तसेच काळी फिल्म लावली होती. त्याच्या कारवरही कारवाई करण्यात आली असून ही कारवाई पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक माधुरी मुळीक, वाहतूक पोलिस मयूर सावंत, आबा पिळणकर यांनी केली आहे.