LIVE UPDATES

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील ड्रेनेज टाक्या ओव्हरफ्लो

रूपा मुद्राळेंची नाराजी : दुर्गंधीमुळे रुग्णांसह नागरिक हैराण
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 29, 2026 05:43 PM
views 33  views

सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयाच्या ड्रेनेच्या टाक्या ओव्हर फ्लो होऊन त्याच सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे रहदारीच्या रस्त्यावर दुर्गंधी पसरली आहे. याचा नाहक त्रास तेथील व्यापारी, रस्त्यावरून चालणारे नागरिक व रुग्णांना होत आहे असे मत सामाजिक बांधिलकीच्या रूपा मुद्राळे यांनी व्यक्त केले आहे.

मागच्या वर्षी अशाच समस्येमुळे ड्रेनेजचा रुग्णांना त्रास होत होता. टॉयलेटला जाण्यासाठी रुग्णांना भयंकर त्रास झाला होता. याची गंभीर दखल घेऊन तात्काळ  सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रूपा मुद्राळे यांनी स्वखर्चाने सर्व टाक्या साफ करून घेतल्या होत्या. त्यानंतर ड्रेनेजच्या टाक्यांची डागडूजी करून त्या साफ करून घेण्याची जबाबदारी ही बांधकाम विभागाची होती.

कित्येक वेळा याची तक्रार देऊन सुद्धा बांधकाम विभागाला याचे गांभीर्य लक्षात घेतलं नाही. त्यामुळे शहरातील नेत्यांनी या गंभीर समस्यांवर जरा लक्ष घालावा अशी मागणी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रूपा मुद्राळे यांनी केली आहे. जे काम येथील नेते व शासन यांनी करायचे आहे ते काम रुग्णांचे हाल नको म्हणून नाईलाज आम्हाला स्वखर्चाने कराव लागत हे दुर्दैव आहे अशी खंत रूपा मुद्राळे यांनी व्यक्त केली. खर्च करायला हरकत नाही. पण, तो किती वेळा करावा यालाही मर्यादा आहे. 

दरम्यान, पंधरा दिवसापूर्वी एक निवेदन दिले होतं. गेल्या दोन महिन्यापासून आयसीयू मधील एसी बंद होत्या त्याचा त्रास रुग्णांना होत होता. उपोषणाचे निवेदन देतात चार दिवसात आयसीमधील एसी सुरू झाल्या. परंतु, खालच्या आयसीयू मधील एसी अद्यापही सुरू झाल्या नाहीत. त्याची गंभीर दखल आमच्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेतली जाईल असा इशारा रूपा मुद्राळे यांनी दिला.


ताजी बातमी

View all

देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या सभेत स्वच्छता अभियानाच्या खर्चावरून वाद
October 29, 2026
Sanketa Sawant and Sai Sawant, sisters who run Eagle Taekwondo Training Centre in Ratnagiri.
Ratnagiri News : दोन सख्ख्या बहिणी चालवतात तायक्वांदो प्रशिक्षण केंद्र
October 29, 2026
Rare Maratha-era historical documents in Modi script discovered in Rajapur, Maharashtra.
Rajapur Historical Documents : दक्षिण कोकणाच्या मध्ययुगीन इतिहासाचे नवे पान उजेडात!
October 29, 2026
Sindhudurg journalists study Daman’s tourism development, clean roads and civic infrastructure.
Daman Development Model : निसर्गसंपत्ती सिंधुदुर्गकडे, विकासाचे मॉडेल दमणकडे!
October 29, 2026
संबंधित बातम्या

View all

देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या सभेत स्वच्छता अभियानाच्या खर्चावरून वाद
October 29, 2026
Rare Maratha-era historical documents in Modi script discovered in Rajapur, Maharashtra.
Rajapur Historical Documents : दक्षिण कोकणाच्या मध्ययुगीन इतिहासाचे नवे पान उजेडात!
October 29, 2026
घुंगुरकाठी साहित्य संमेलनात ‘शब्दांगण’ ग्रंथ प्रदर्शन
October 29, 2026
नव्या नळपाणी योजनेचे टेस्टिंग पूर्ण होईपर्यंत जुनी जलवाहिनी सुरू ठेवा
October 29, 2026