LIVE UPDATES

शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे यांचा वाढदिवस उत्साहात

सामाजिक उपक्रमांचे आयोजन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 22, 2026 20:42 PM
views 59  views

सावंतवाडी : शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी तसेच शिवसैनिकांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिनेश गावडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याचे कौतुक केले.

जिल्हाप्रमुख संजू परब म्हणाले, दिनेश गावडे हे राजकारणी नसू़न समाजकारणी आहेत. त्यांचे भवितव्य उज्वल असून त्यांच्यासोबत आम्ही सदैव आहोत अशी भावना व्यक्त केली. याप्रसंगी तालुकाप्रमुख बबन राणे, जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर, रमाकांत राऊळ, आनंद वरक, संजय गावडे, स्वप्नील परब, नंदू गावडे, बबन गावडे, यश गावडे, परेश सोंसुरकर, देव्रत राऊळ, क्लेटस फर्नांडीस, वामन नार्वेकर, सचिन साटेलकर तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

दरम्यान, विविध सामाजिक उपक्रमांनी त्यांचा साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातून  शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, सभापती सुस्मिता जाधव, पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा, सावंतवाडी तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, माजी सरपंच, शिवसेना कार्यकर्ते यांनी दिनेश गावडे यांना वाढदिवसासह त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. चौकुळ गावातील शेतकऱ्यांना यानिमित्ताने खत वितरण करण्यात आले. थेट शेताच्या बांधावर हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शेतकरी बांधवांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आंबोली माजी सरपंच जगन्नाथ गावडे, सुनिल नार्वेकर, दादा नाटलेकर, आंनद गावडे, बबन गावडे,यश गावडे, देवरथ राऊळ आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.