LIVE UPDATES

Sawantwadi Moti Lake : मोती तलावाच्या सौंदर्यात भर

'एलईडी लॅम्प'ची नवी झळाळी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 08, 2026 14:03 PM
views 77  views

सावंतवाडी : 'द हार्ट ऑफ सावंतवाडी' अशी ओळख असलेल्या ऐतिहासिक मोती तलावाला नवी झळाळी प्राप्त झालीय. नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांच्या पाठपुराव्याने नवे 'एलईडी लॅम्प' तलाव काठावर बसविण्यात आलेत. त्यामुळे गणेशोत्सवात तलाव काठ आणखीनच उजळून जाणार आहे.

मोती तलाव काठावरील जुने लॅम्प काढून तिथे हे नवीन लॅम्प बसविण्यात आलेत. ४५ हून अधीक हे लॅम्प मोती तलावाच्या सौंदर्यात भर टाकणार आहेत. नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. तलाव सुशोभित करण्यासाठी हे नवे दिवे लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे सायंकाळी डोळ्यांचे पारणे फेडणारा मोती तलाव आणखीनच उजळून निघणार आहे.