
सावंतवाडी : तालुका नाभिक संघटनेच्यावतीने शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांचा सत्कार करण्यात आला. तसेच संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संजू परब यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत, रक्तदान हे श्रेष्ठ सामाजिक कार्य असून गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध होण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे नाभिक संघटनेच्या आपण कायम सदैव पाठीशी राहणार असे सांगितले.
या कार्यक्रमास नाभिक संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच शिवसेना जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर, ओबीसी मोर्चा तालुकाप्रमुख वासुदेव होडावडेकर,युवासेना तालुका प्रमुख क्लेटस फर्नांडीस, उपतालुका प्रमुख राकेश पवार, राजू मुळीक संदीप तळवणेकर आदी उपस्थित होते.
ताजी बातमी
View all

Mumbai Goa Highway traffic update : गणेशोत्सवात 'या' कालावधी.....
September 08, 2026

Sawantwadi Moti Lake : मोती तलावाच्या सौंदर्यात भर .....
September 08, 2026

सिंधुदुर्गातील कृषी जैवविविधता लोकस.....
September 08, 2026

Ratnagiri news : गवारेड्याच्या हल्ल्यात जखमी त.....
September 08, 2026







