LIVE UPDATES

ओंकार हत्ती गोव्यातून पुन्हा कळणे गावात

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 25, 2026 20:34 PM
views 83  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातून गोव्यात गेलेला ओंकार हत्ती मंगळवारी पुन्हा कळणे गावात आला. दोडामार्ग बांदा मार्गावर मायनिंगच्या गेट समोर ओंकार हत्ती उभा राहिल्याने दोडामार्ग बांदा मार्गावरील सर्व वाहतूक खोळंबली होती. हत्ती रस्त्यावर आल्याने बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

गेले अनेक महिने दोडामार्गात धुडगूस घालणारा ओंकार हत्ती लगतच्या गोवा राज्यातील मोपा परिसरात गेला होता. गोवा राज्यातील वनविभागाने त्याला हाकल्यानंतर नेतर्डे, डोंगरपाल मार्गे पुन्हा तो दोडामार्ग कळणे परिसरात मंगळवारी आला. कळणे मायनिंग गेटच्या समोर दोडामार्ग बांदा मार्गावर उभा राहत त्याने अर्धा तास दोन्ही बाजूची वाहतूक बंद केली. त्या नंतर तो तो पुन्हा लगतच्या ओहळात उतरून डोंगरपालच्या दिशेने गेल्याचे वनविभागाने सांगितले.