LIVE UPDATES

सावंतवाडी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संतोष राणे

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 29, 2026 17:56 PM
views 18  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संतोष राणे तर  उपाध्यक्षपदी प्रेमानंद देसाई, सचिवपदी सुहास गावडे, सहसचिव सचिन बागवे, अशोक परब तर खजिनदारपदी स्टीव्हन डिसिल्वा यांची निवड करण्यात आली. सावंतवाडी तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशच्या बैठकीत ही एकमताने निवड करण्यात आली.

 यावेळी तालुका असोसिएशनच्या जनसंपर्क अधिकारी म्हणून संयोगिता काळकुंद्रीकर, तर संघटक सचिव म्हणून बाबुराव मुळीक, श्रीकांत आरोंदेकर, प्रशांत पेडणेकर, महादेव सावंत यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणून आनंद रासम, विनायक दळवी, संदीप राऊळ, अमर गावडे, दिगंबर गायतोंडे यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी झालेल्या सभेच्या व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आनंद रासम, निवडणूक निरीक्षक दयानंद उबाळे, निवडणूक निरीक्षक विजय घाडी, सावंतवाडी तालुका अध्यक्ष विनायक दळवी, सचिव संतोष राणे, खजिनदार कालिदास बर्वे आदी उपस्थित होते.

 यावेळी आनंद रासम यांनी केमिस्ट बांधवांना औषध विक्री व दक्षता याबाबत मार्गदर्शन करून केमिस्ट बांधवांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही दिली. यावेळी दयानंद उबाळे यांनी औषध कायदा याविषयी माहिती देऊन केमिस्ट बांधवांनी त्या दृष्टीने सतर्क राहण्याचे आवाहन केले. यावेळी विनायक दळवी यांनी आपल्या गेल्या १४ वर्षाच्या अध्यक्ष पदाच्या काळात सर्व पदाधिकाऱ्यांसह सदस्यांचे उत्कृष्ट सहकार्य लाभल्याचा आवर्जुन उल्लेख करून यापुढेही केमिस्ट बांधवांच्या हितासाठी कार्यरत राहण्याची ग्वाही दिली.  यावेळी सावंतवाडी तालुका केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्रीराम गावडे, सचिन मुळीक, ग्रेगरी डांटस, श्रीकृष्ण सप्ते, विश्रांती नाईक सुधीर शिरसाट, उमेश कालकुंद्रीकर, प्रसाद गुरव, आशिष सावंत, गोविंद आर्डेकर, पराग सावंत,  रवि धाकोरकर, अर्जुन कदम  कार्लोस  डिसिल्वा, बाळू घाटकर, गिरीधर चव्हाण, रॉक्सन डान्टस, सुरेश आडेलकर, वैष्णव केसरकर, आनंद जाधव, साईराज गावडे, प्रसाद ढेरे, स्वप्निल सावंत. गणपती काळ कुंद्रीकर आदी उपस्थित होते.