
सावंतवाडी : सम्राट क्लब सावंतवाडी टाऊनच्यावतीने आणि १२१ वर्षे पूर्ण झालेल्या श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सालईवाडा सावंतवाडी यांच्या गणेशोत्सवानिमित्त 'सम्राट संगीत संध्या २०२६' या खास सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८.३० वाजता सालईवाडा गणेशोत्सव मंडळ, सावंतवाडी येथे होणार आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभास स्थानिक नगरसेविका सुकन्या टोपले आणि पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे
या संगीतमय कार्यक्रमात भक्तीगीते, भावगीते आणि नाट्यसंगीत यांची सुरेल मैफल रंगणार आहे. यामध्ये सम्राट हर्ष नकाशे, सम्राट ॲड. सिद्धी परब, सम्राट स्मिता केंकरे आणि विधीता केंकरे गायन करणार असून साथसंगत हार्मोनियमवर निलेश मेस्त्री आणि तबल्यावर नीरज भोसले साथ देतील.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन सम्राट गुरुप्रसाद चिटणीस आणि सम्राट प्रतिभा चव्हाण हे करणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक म्हणून सम्राट क्लबचे अध्यक्ष सम्राट नरेंद्र देशपांडे, सचिव सम्राट प्रतिभा चव्हाण आणि खजिनदार सम्राट सुनील राऊळ हे काम पाहत आहेत.
संगीत, संस्कृती आणि मैत्रीचा हा सुरेल सोहळा अनुभवण्यासाठी सर्व संगीतप्रेमींनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सम्राट क्लब सावंतवाडी टाऊनतर्फे अध्यक्ष नरेंद्र देशपांडे,भावी अध्यक्ष हरिश्चंद्र पवार आणि कार्यकारिणी संचालक व सदस्यांनी केले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










