LIVE UPDATES

आसोली- वडखोल येथे रस्ता खचला

रहिवासी पेंडसे यांच्या घराला धोका
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: July 07, 2026 17:37 PM
views 219  views
#kokansadlive#news update#konkan update#

वेंगुर्ले : आसोली- वडखोल गावातील पेंडसे यांच्या घराजवळील रस्ता अचानक खचल्याने मोठा खड्डा पडला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली असून पेंडसे कुटुंबाच्या घरालाही धोका निर्माण झाला आहे.रस्ता खचल्याची माहिती मिळताच घटनास्थळी जिल्हा परिषद सदस्य  संजय गावडे, माजी उपसरपंच विकी केरकर यांनी तातडीने भेट देऊन पाहणी केली. यावेळी घरमालक सौ. पेंडसे, गौरव पेंडसे, बाळु गावडे आणि मधुकर गावडे उपस्थित होते.रस्ता खचल्यामुळे पुढे पावसात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. घराला असलेल्या धोक्यामुळे पेंडसे कुटुंबात भीतीचे वातावरण आहे. याबाबत संबंधित आपत्ती विभागाने याची पाहणी करून तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी  तसेच पेंडसे यांच्या घराचे संरक्षण करावे, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्याकडे करणार असल्याचे यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले.