LIVE UPDATES

सापडलेले पैशाचे पाकीट केले परत

दाणोलीच्या वसंत बिले यांचा प्रामाणिकपणा
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 22, 2026 17:43 PM
views 56  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : बांदा ते आंबोली प्रवासादरम्यान मोटारसायकलने प्रवास करीत असताना रस्त्यावर सापडलेले पैशांचे पाकीट स्वतःकडे न ठेवता ते वाहतूक पोलिसांकडे जमा करून प्रामाणिकपणाचे दर्शन घडविणाऱ्या दाणोली बाजार येथील वसंत गजानन बिले याचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

पाकिटात ४ हजार २०० रुपये रोख रक्कम तसेच महत्त्वाची कागदपत्रे होती.आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास वसंत बिले मोटारसायकलने बांदा ते आंबोली असा प्रवास करीत होते. यावेळी सातोळी गावाच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला त्यांना पैशांचे पाकीट आढळून आले. 

बिले यांनी कोणताही विलंब न करता सदर पाकीट व कागदपत्रे सातोळी चेक नाका येथे कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस सापळे आणि आरोलकर यांच्याकडे जमा केले. कागदपत्रांवरील माहितीच्या आधारे पाकिटाच्या मालकाचा शोध घेण्यात आला. त्यानंतर  हर्षित शेट्टी, रा. विकराबाद, तेलंगणा यांच्याशी संपर्क साधण्यात आला. शेट्टी यांनी दिनांक २१ सप्टेंबर रोजी गोवा ते तेलंगणा प्रवास करत असताना आपले पाकीट व कागदपत्रे गहाळ झाल्याचे सांगितले.सापडलेल्या पैशांपेक्षा माणुसकीला अधिक महत्त्व देत बिले यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.