
सिंधुदुर्गनगरी : कुडाळ दुकानवाड येथील सेवानिवृत्त केंद्रप्रमुख मधुकर ऊर्फ भाई सिताराम म्हाडगुत, वय ७३, सध्या रा.माणगांव बाजार यांचे माणगाव येथील राहत्या घरी दिर्घ आजाराने शुक्रवारी रात्री निधन झाले.
त्यांच्यावर दुकानवाड येथील स्मशानभूमीत शनिवारी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, पुतणे, भाऊ, भावजय, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सिंधुदुर्ग बाल कल्याण समिती सदस्य अॅड .लिना म्हाडगुत-नेवगी यांचे ते वडील होत.