देवगड पं. स.त खा.विनोद तावडे - आ. प्रमोद जठार यांच्या अभिनंदनाचा ठराव

Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 06, 2026 15:41 PM
views 115  views

देवगड :  राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झालेले विनोद तावडे आणि विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती झालेले प्रमोद जठार यांच्या अभिनंदनाचा ठराव देवगड पंचायत समिती येथे दि .४ तारीखला झालेल्या मासिक बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. 

पंचायत समिती देवगड मासिक सभेत अभिनंदनाचा ठराव मांडला. यावेळी  विनोद तावडे आणि प्रमोद जठार हे दोन्ही नेते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. या दोन्ही नेत्यांच्या निवडीचा पंचायत समितीच्या या मासिक बैठकीत मांडण्यात आलेल्या या ठरावाला संपूर्ण सभागृहाने टाळ्यांच्या कडकडाटात अनुमोदन दिले. सिंधुदुर्गच्या या दोन सुपुत्रांनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल यावेळी सभापती गणेश राणे यांनी आनंद व्यक्त केला. तसेच बारावीमध्ये पास झालेल्या सर्व विदयार्थ्यांचे अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला.