
कणकवली : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी यांच्यावतीने हरकुळ बुद्रुक मतदार संघातील शालेय विद्यार्थ्यांना 2,500 रक्तचंदन रोपांचे वाटप करण्यात आले. यामध्ये हरकुळ बुद्रुक मधील ल. गो. सामंत विद्यालय, उर्दू शाळा, जंगमवाडी शाळा या प्रशाळेतील विद्यार्थ्यांना रक्तचंदनची रोपे वाटप करण्यात आली.
यावेळी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, पंचायत समिती सदस्य सौ. दिव्या पेडणेकर, सरपंच आनंद ठाकूर, बाबासाहेब वर्देकर, राजू पेडणेकर, नित्यानंद चिंदरकर, नारकर गुरुजी, बाळू मोर्ये, मामा माणगावकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. नवाळे मॅडम आदी शिक्षक व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.











