LIVE UPDATES

बालगंधर्व...'नांदी ते भैरवी'

बालगंधर्वांच्या जीवन प्रवासावर संगीतमय कार्यक्रम
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 23, 2026 13:16 PM
views 22  views

सावंतवाडी : पन्नास वर्ष नाट्य रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या नटश्रेष्ठ बालगंधर्वांच्या जयंती निमित्त सावंतवाडी येथील क्षितिज इव्हेंट या संस्थेने शुक्रवार २६ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता आरपीडी हायस्कूल , सावंतवाडी येथे बालगंधर्वांच्या संगीतमय जीवन प्रवासावर आधारित बालगंधर्व नांदी ते भैरवी या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.


या कार्यक्रमाची निर्मिती श्री परमेश्वर प्रोडक्शनची असून कार्यक्रमाची संकल्पना आणि संहीता लेखन बाळ पुराणिक यांनी केले आहे. बालगंधर्वांचा जन्म, त्यांचा रंगभूमीवरील प्रवेश, त्यांनी  केलेल्या  भूमिका, त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग, त्यांची लोकप्रिय गाणी आणि त्यांचा उत्तरार्ध असा पूर्ण जीवन प्रवास या कार्यक्रमातून मांडण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आघाडीचे प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायक आणि नाट्य अभिनेते स्वप्निल गोरे, गायिका राधा जोशी या सहभागी होणार असून त्यांना ऑर्गन साथ प्रसिद्ध ऑर्गन वादक प्रसाद शेवडे आणि तबला साथ अभिनव जोशी हे करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन बाळ पुराणिक आणि सौ उमा जडये करणार आहेत. हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य ठेवण्यात आलेला आहे. सर्व रसिकांनी बहुसंख्येने या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन क्षितिज इव्हेंट या संस्थेमार्फत करण्यात आले आहे.