
रत्नागिरी : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका 'MH-08-BP-0001 ते MH-08-BP-9999' दिनांक ६ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू करण्यात येत आहे.
या नव्या मालिकेतील आकर्षक आणि पसंतीचे नोंदणी क्रमांक मिळवण्यासाठी वाहनधारकांसाठी अर्ज व लिलाव प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा तसेच कार्यालयीन व्यवस्थेवर ताण न पडता इच्छुकांना पसंतीचा क्रमांक सुलभतेने मिळावा, यासाठी ही विशेष कार्यपद्धती राबविण्यात येत असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी दिली आहे.
चारचाकी व इतर परिवहन वाहनांसाठी (तीनपट शुल्क भरून) अर्ज सादर करावेत. ज्या चारचाकी अथवा इतर परिवहन वाहनधारकांना या नव्या दुचाकी मालिकेतील पसंतीचा क्रमांक हवा असेल, त्यांनी तीनपट शुल्क भरून ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० या वेळेत विहित नमुन्यात अर्ज सादर करावा, अशी माहिती करपे यांनी दिली.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










