
रत्नागिरी : जिल्हास्तरीय नगरोत्थान योजनेतून साकारलेले संग्रहालय शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास, दुर्गस्थापत्य कला आणि स्वराज्याचा समृद्ध वारसा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अत्यंत मोलाचे ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
युनेस्कोने २०२५ मध्ये जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती असलेल्या संग्रहालयाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते या संग्रहालयाचे लोकार्पण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, दूरदृष्टी आणि स्वराज्याच्या इतिहासाचे साक्षीदार असलेल्या गडकिल्ल्यांचा गौरवशाली वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम साकारण्यात आला आहे. जिल्हास्तरीय नगरोत्थान योजनेतून या संग्रहालयाच्या उभारणीसाठी ३० लाखाचा निधी देण्यात आला आहे. या संग्रहालयात महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ अशा एकूण १२ किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत.
यामध्ये साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याचा समावेश आहे. कार्यक्रमाला नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, मुख्याधिकारी वैभव गारवे आदी उपस्थित होते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








