
रत्नागिरी : वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी उजव्या डोळ्याच्या मोतीबिंदूमुळे दृष्टीच्या समस्येला सामोरे जाणाऱ्या रत्नागिरीतील मिताली राऊत या तरुणीला मदतीचा हात मिळाल्याने तिला पुन्हा स्पष्ट दृष्टी प्राप्त झाली आहे. अनिकेत पटवर्धन यांच्या सहकार्यामुळे तिची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.
कु. मिताली राऊत हिला उजव्या डोळ्याला मोतीबिंदू झाल्याने दिसण्यास त्रास होत होता. तसेच डोळ्यातून सतत पाणी येणे आणि जळजळ होणे अशा समस्यांचाही तिला सामना करावा लागत होता. ही बाब समजल्यानंतर अनिकेत पटवर्धन यांनी परिस्थितीची दखल घेत तिला आवश्यक वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या सहकार्याने २३ नोव्हेंबर २०२६ रोजी रत्नागिरी येथील INFIGO EYECARE HOSPITALS येथे मितालीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. मीना महामुलकर यांनी ही शस्त्रक्रिया केली. यावेळी आधुनिक MICS पद्धतीचा वापर करण्यात आला. तसेच मितालीच्या डोळ्यात अत्याधुनिक Foldable TORIC EDOF लेन्स बसवण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर मितालीच्या दृष्टीत सुधारणा झाली असून तिची प्रकृती स्थिर असल्याने तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. गरजू व्यक्तीच्या अडचणीच्या काळात मदतीसाठी पुढे येणाऱ्या अशा सामाजिक कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








