LIVE UPDATES

सिंधुदुर्ग काँग्रेस अनुसूचित जाती विभाग चेअरमनपदी राजेंद्र कदम

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 19, 2026 13:05 PM
views 52  views
#kokansadlive#news update#konkan update#

सिंधुदुर्गनगरी : अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित विभागाचे राष्ट्रीय चेअरमन राजेंद्र पाल गौतम यांनी जाहीर केली आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या प्रमुखपदी (चेअरमन) राजेंद्र कदम यांची नियुक्ती केली आहे. 

शिक्षकी पेशात ३५ वर्षे सेवा बजावून आता निवृत्त झालेले राजेंद्र कदम त्यांच्या सेवा काळात शैक्षणिक क्षेत्रात राज्य व जिल्हा पातळीवर एक उत्कृष्ट मार्गदर्शक म्हणून त्यांची ओळख होती. "समता आणि सामाजिक न्याय" या त्यांच्या शोध निबंधास डाॅ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्था पुणे यांचेकडून गौरविण्यात आले होते. 

या शिवाय महाराष्ट्रातील अनेक सेवाभावी संस्थांकडून अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. वयाच्या २१ व्या वर्षी महेंद्र नाटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षात काम करण्याची संधी मिळाली तेव्हा पासून ते काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहेत. 

अशा कार्यकर्त्याची काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाच्या प्रमुख (चेअरपरसन) पदी नियुक्ती झाल्यामुळे त्यांचे अभिनंदन होत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस जिल्ह्याचे माजी अध्यक्ष साईनाथ चव्हाण, जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष इर्शाद शेख, विलास गावडे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद मोंडकर,जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष नागेश मोर्ये,अनिल डगवेकर,सरचिटणीस वरूनकर इत्यादींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.