LIVE UPDATES

देशी गोवंश गोशाळा गोपालक संघाच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम ओगले

सिंधुदुर्गात नव्या संघटनेची स्थापना
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 31, 2026 17:26 PM
views 23  views

सिंधुदुर्ग : ‘देशी गोवंश गोशाळा गोपालक संघ, सिंधुदुर्ग’ या संघटनेची स्थापना करण्यात आली. संघाच्या अध्यक्षपदी देवगड येथील पुरुषोत्तम (काका) जनार्दन ओगले यांची निवड करण्यात आली. देशी गोवंशाचे संरक्षण व संवर्धन करणाऱ्या गोशाळा आणि गोपालकांना एका छताखाली आणत त्यांच्या प्रश्नांना संघटितपणे न्याय देण्यासाठी या संघाची स्थापन करण्यात आली आहे. या संघटनेच्या माध्यमातून देशी गोवंश संवर्धनाची चळवळ जिल्हाभर व्यापक करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

संघाची कार्यकारिणी पुढील प्रमाणे, अध्यक्षपदी पुरुषोत्तम ओगले, कार्याध्यक्षपदी महेश संसारे (वैभववाडी), उपाध्यक्षपदी प्रफुल्ल पवार (वैभववाडी) आणि नारायण आत्माराम सिद्धये (दोडामार्ग) , कार्यवाहपदी सुवर्णा सुरेश रावराणे (वैभववाडी), सहकार्यवाहपदी चैतन्य रविंद्र सावंत (कुडाळ), खजिनदारपदी दिवाकर विठ्ठल ठाकूर (फोंडा), कार्यकारिणी सदस्यपदी स्वागत नाटेकर (सावंतवाडी), भालचंद्र  परब (मालवण), धनंजय  प्रभुदेसाई (कणकवली) आणि नितीन लिंगोजी (वेंगुर्ला) यांची निवड करण्यात आली आहे.