LIVE UPDATES

प्रा. विशाल कुशे यांना सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पीएचडी

एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने सत्कार
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 29, 2026 17:00 PM
views 37  views
#kokansadlive#news update#konkan update#

सिंधुदुर्ग : जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट या अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा. विशाल प्रमोद कुशे यांना नुकतीच एमिटी युनिव्हर्सिटी मुंबई या विद्यापीठाकडून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पीएचडी प्रदान करण्यात आली. (GIS) जी आय एस चा वापर करून महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्गातील समुद्राच्या पाण्याची घुसखोरीमुळे भूजल असुरक्षिततेचे मॅपिंग आणि मूल्यांकन या विषयावर त्यांनी आपला शोध प्रबंध विद्यापीठास सादर केला होता. ही पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

डॉ. सुश्री संगीता मिश्रा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली प्रा. विशाल कुशे यांनी सिव्हील इंजिनिअरिंग मध्ये पीएचडी पूर्ण केली आहे. डॉ. कुशे यांनी पीएचडीच्या संशोधनात GIS वापर करुन विशेष संशोधन केले आहे. या संशोधनाचा उपयोग समुद्रलगतच्या पिण्याच्या पाण्याची क्षारता समजण्यासाठी करता येईल. चार वर्षाच्या परिश्रमानंतर त्यांनी ही पदवी प्राप्त केली. या यशाबद्दल एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी जयवंती बाबू फाउंडेशन संस्थेचे विश्वस्त यांनी डॉ. विशाल कुशे यांचे अभिनंदन करताना शिक्षकांनी उच्च शिक्षण पूर्ण करून आपले ज्ञान अद्यावत ठेवावे आणि विद्यार्थ्यांसाठी आदर्श निर्माण करावा असे मत व्यक्त केले.

डॉ. विशाल प्रमोद कुशे यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, पत्नी, मार्गदर्शक, सहकाऱ्यांना तसेच संस्थेच्या विश्वस्तांना दिले आहे. याबद्दल त्याचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांस कडून विशेष अभिनंदन केले जात आहे.