LIVE UPDATES

Kudal News : प्राजक्त चव्हाण यांना एलएल.बी. पदवी

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 28, 2026 19:00 PM
views 18  views

कुडाळ : क. म. शि. प्र. मंडळाच्या इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूलचे सहाय्यक शिक्षक प्राजक्त चव्हाण यांनी व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेजमधून मुंबई विद्यापीठाची विधी शाखेची (L.L.B) पदवी प्राप्त केली आहे.

या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका मुमताज शेख यांनी त्यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन विशेष गौरव केला. चव्हाण हे 'श्रमिक कामगार संघटने'चे संस्थापक अध्यक्ष असून शिवसेनेचे कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे अनुसूचित जाती प्रमुख म्हणूनही कार्यरत आहेत.

आपल्या या विधी पदवीचा वापर कष्टकरी व कामगार वर्गाच्या न्याय-हक्कांसाठी आणि जनकल्याणासाठी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.