LIVE UPDATES

२० मे पासून पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरू

YBIT येथे अधिकृत प्रवेश सुविधा केंद्र उपलब्ध
Edited by: विनायक गांवस
Published on: May 19, 2026 19:18 PM
views 24  views

सावंतवाडी : महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालया मार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पॉलिटेक्निक - डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया दि. २० मे २०२६ पासून सुरू होत असून २२ जून २०२६ पर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. 


सावंतवाडीतील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे शासनमान्य अधिकृत प्रवेश सुविधा केंद्र (FC) उपलब्ध करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्र पडताळणी, अर्ज निश्चिती तसेच प्रवेश प्रक्रियेबाबत आवश्यक मार्गदर्शन मोफत दिले जाणार आहे. सोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी संस्थेतर्फे कुडाळ, वेंगुर्ला, माणगाव, मळेवाड व दोडामार्ग येथेही प्रवेश सुविधा केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांवर विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील सर्व प्रकारचे मार्गदर्शन, अर्ज भरण्यास मदत तसेच आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली जाणार आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र राहतील. विद्यार्थ्यांनी व पालकांनी वेळेत नोंदणी करून जवळच्या प्रवेश सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9404272566 या क्रमांकावर संपर्क साधावा.