LIVE UPDATES

श्रमिक कामगार संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी आत्माराम साटेलकर

महिला जिल्हाध्यक्षपदी अंतरा गावडे
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: May 19, 2026 21:02 PM
views 55  views

कुडाळ : श्रमिक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांच्या उपस्थितीत कुडाळ येथे जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची सभा संपन्न झाली. या सभेत कामगारांच्या अडचणी जाणून घेत संघटनेची नूतन जिल्हा व तालुका कार्यकारिणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी आत्माराम साटेलकर तर महिला जिल्हाध्यक्षपदी अंतरा गावडे यांची निवड करण्यात आली. याशिवाय नामदेव जानकर (जिल्हा सचिव), दिनेश बळी (उपाध्यक्ष), संजना पाटकर (महिला सचिव), दत्ताराम वारंग (कुडाळ तालुकाध्यक्ष), रविंद्र गुरव (कुडाळ सचिव), भैरु पाटील (दोडामार्ग तालुकाध्यक्ष) आणि दीपक देऊलकर (मालवण तालुकाध्यक्ष) यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.

सभेत कामगारांनी काही गावांमध्ये ग्रामसेवक विविध दाखल्यांवर सही देत नसल्याची व शिष्यवृत्ती प्रलंबित असल्याची तक्रार केली. त्यावर अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी, "ग्रामसेवकांनी सही देण्यास नकार दिल्यास थेट मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) व आमदारांकडे तक्रार करून प्रश्न सोडवू," अशी ग्वाही दिली. नूतन जिल्हाध्यक्ष आत्माराम साटेलकर यांनीही कामगारांच्या हक्कांसाठी संघटना सदैव पाठीशी राहून संघटन अधिक मजबूत करेल, असा विश्वास दिला. या सभेला जिल्ह्यातील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.