LIVE UPDATES

विलास कांबळे यांचे निधन

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: May 19, 2026 22:26 PM
views 50  views

कणकवली : सिद्धार्थनगर येथील विलास महादेव कांबळे (४७) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात निधन झाले. विलास हे फरशी बसविण्याचे व पॉलिश करण्याचे काम करत असत. ते शांतिदूत कला - क्रीडा मंडळ कणकवलीचे संस्थापक उपाध्यक्ष देखील होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन बहिणी असा परिवार आहे. ते सावंतवाडी नगरपालिकेचे कर्मचारी दीपक कांबळे यांचे सख्खे बंधू तर सामाजिक कार्यकर्ते तथा सत्यशोधक संघटनेचे नेते ऍड. सुदीप कांबळे यांचे चुलत बंधू होत.