
सावंतवाडी : भाजप युवा मोर्चा आयोजित नरकासुर स्पर्धेस तुफान प्रतिसाद मिळाला. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत तलावाकाठी मध्यरात्री ही स्पर्धा संपन्न झाली. भाजप नेते विनोद राऊळ, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर व युवा नेते विशाल परब यांची उपस्थिती विशेष ठरली. तर भाजप महामहोत्सवासह आज सायंकाळी तलावकाठी फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार असल्याचे युवा नेते विशाल परब यांनी जाहीर करत दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून हा सोहळा संपन्न झाला. या स्पर्धेत सहभागी झालेल्या अक्राळ विक्राळ नरकासुरांच्या प्रतिमांनी लक्ष वेधून घेतले होते. या भव्य स्पर्धेचे उद्घाटन भाजपा ज्येष्ठ नेते विनोद राऊळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर आणि युवा नेते विशाल परब या त्रिमूर्तींची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली.
यावेळी उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर यांनी याच ठिकाणी पर्यटन महोत्सव पुन्हा एकदा जोमात होईल असा पुनरुच्चार केला. तर उपसभापती गौरव मुळीक यांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. युवा नेते विशाल परब आपल्या मनोगतात म्हणाले, सावंतवाडीकरांची सेवा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आशीर्वाद, जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन, तसेच ज्येष्ठ नेते विनोद राऊळ आणि उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांची भक्कम साथ आमच्या पाठीशी आहे.
सावंतवाडीच्या जनतेच्या प्रेमाच्या बळावर यापुढेही असेच भव्य सामाजिक, सांस्कृतिक आणि लोकाभिमुख उपक्रम राबविणार आहोत. आगामी काळात भारतीय जनता पार्टीच्या वतीने सावंतवाडीत भव्य-दिव्य 'सावंतवाडी महोत्सव' आयोजित करण्याची घोषणा केली. तसेच आज सायंकाळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर, युवा मोर्चा अध्यक्ष हितेन नाईक, मोहिनी मडगावकर, दिपाली भालेकर, दिलीप भालेकर, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, जितेंद्र गांवकर, सुकन्या टोपले, सुनिता पेडणेकर, विनेश तावडे आदींसह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेचे परिक्षण राजेश आजगावकर, उदय राऊत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बादल चौधरी यांनी तर आभार नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांनी मानले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








