LIVE UPDATES

सावंतवाडीत जिल्हास्तरीय नगराध्यक्ष चषक स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

५०० हून अधिक स्पर्धकांनी घेतला सहभाग
Edited by: विनायक गांवस
Published on: July 04, 2026 11:59 AM
views 103  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : 

सावंतवाडी नगरपरिषदेकडून पुण्यश्लोक हि. हा. श्रीमंत मेजर पंचम खेमराज तथा बापूसाहेब महाराज पुण्यतिथीनिमित 'जिल्हास्तरीय नगराध्यक्ष चषक स्पर्धा २०२६' आयोजित करण्यात आली होती. राजेसाहेब खेमसावंत भोंसले, राणीसाहेब शुभदादेवी भोंसले यांच्या हस्ते याचा शानदार शुभारंभ करण्यात आला. जवळपास ५०० हून अधिक स्पर्धकांनी यात सहभाग घेतला आहे.

यामध्ये कॅरम, बॅडमिंटन, बुद्धीबळ, टेबल टेनिस आणि चित्रकला अशा इनडोअर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. नगरपरिषदेच्या जिमखाना मैदानाकडील स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये आयोजित या चषकाचा शुभारंभ राजेसाहेब खेमसावंत भोंसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब म्हणाले, भव्यदिव्य नगराध्यक्ष चषकाच्या माध्यमातून रामराजा पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे कार्य होत आहेत. यासाठी क्रीडा सभापती सुधीर आडिवरेकर यांचे विशेष कौतुक आहे. तर बापूसाहेब महाराजांच कार्य पुढे घेऊन जाण्यासह क्रीडा गुणांना वाव देण्याच काम यानिमित्ताने होत असल्याचे उद्गार उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी काढले. नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले म्हणाल्या, शालेय अभ्यासक्रमासह खेळात निपूण विद्यार्थांना प्रोत्साहन मिळण्यासाठी या चषकाचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांचा वारसा जोपासण्याचा आमचा प्रयत्न आहे. 

दरम्यान, राणीसाहेब शुभदादेवी भोंसले यांनी आयोजकांचे कौतुक करत स्पर्धक विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. राजेसाहेब खेमसावंत भोंसले यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. सावंतवाडीतून अनेक जण क्रीडा क्षेत्रात घडले असून राज्यात, देशात नावलौकिक प्राप्त केला आहे. खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी न.प. ने घेतलेला पुढाकार ही बाब कौतुकास्पद आहे असे मत श्री. भोंसले यांनी व्यक्त केले. याप्रसंगी क्रीडा व आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांचा वाढदिवस देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच स्पर्धांच्या परीक्षकांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राजेसाहेब खेम सावंत भोंसले, राणीसाहेब शुभदादेवी भोंसले, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, माजी नगराध्यक्ष संजू परब, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, महिला सभापती दिपाली भालेकर, नियोजन सभापती आनंद नेवगी, पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, नगरसेवक दुलारी रांगणेकर, निलम नाईक, ॲड. सायली दुभाषी, सुकन्या टोपले, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, अजय गोंदावळे, देवा टेमकर, सुनिता पेडणेकर, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक आदी नगरसेवक, नगरसेविका आदींसह चित्रकार अक्षय सावंत, संतोष मोरजकर, केतन आजगावकर, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती प्रतीक बांदेकर यांनी केलं. सूत्रसंचालन गजानन परब तर आभार क्रीडा सभापती सुधीर आडिवरेकर यांना मानले.