LIVE UPDATES

सुधीर आडिवरेकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव !

५१ वा वाढदिवस उत्साहात साजरा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 04, 2026 15:06 PM
views 134  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी :

 सावंतवाडी नगरपरिषदचे आरोग्य व क्रीडा सभापती तथा नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांचा ५१ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध स्तरातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. नगराध्यक्ष चषक स्पर्धेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच जयप्रकाश चौक मित्रमंडळ, जुनाबाजार मित्रमंडळाकडून नगरपरिषदेच्या सभापती कक्षात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी राजेसाहेब खेम सावंत भोंसले, राणीसाहेब शुभदादेवी भोंसले, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, माजी नगराध्यक्ष संजू परब, महिला सभापती दिपाली भालेकर, नियोजन सभापती आनंद नेवगी, पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, नगरसेवक दुलारी रांगणेकर, निलम नाईक, ॲड. सायली दुभाषी, सुकन्या टोपले, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, अजय गोंदावळे, देवा टेमकर, सुनिता पेडणेकर, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक आदींसह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.