LIVE UPDATES

सावंतवाडी-आंबोली मार्गावर महाकाय झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 24, 2026 07:19 PM
views 48  views

सावंतवाडी : शनिवारी दुपारी झालेल्या मुसळधार वादळी पावसामुळे सावंतवाडी-आंबोली राज्य मार्गावर नगरपालिका कचरा डेपोच्या शेजारी एक भलेमोठे झाड रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली. या अचानक घडलेल्या घटनेमुळे राज्यमार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून रस्त्यावर वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

झाड कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आपत्कालीन परिस्थितीत स्थानिकांनी स्वतःहून पुढाकार घेत झाड बाजूला करून रस्ता मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू केले. सायंकाळी उशिरापर्यंत हे झाड रस्त्यावरून हटवून वाहतूक पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. हा मार्ग सावंतवाडीला आंबोली व इतर महत्त्वाच्या भागांशी जोडणारा मुख्य दुवा असल्याने प्रवाशांची आणि वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली. मात्र, स्थानिक ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे व अथक प्रयत्नांमुळे मार्ग मोकळा करण्याचे काम वेगाने पूर्ण केले जात आहे.