LIVE UPDATES

पर्यावरण फ्रेंडली बाप्पा स्पर्धेचे आयोजन

कसई -दोडामार्ग नगरपंचायतचा उपक्रम
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 09, 2026 12:18 PM
views 23  views
#kokansadlive#news update#konkan update#

दोडामार्ग : कसई दोडामार्ग नगरपंचायतच्या माध्यमातून गणेश चतुर्थी निमित्त घरगुती गणेश सजावट पर्यावरण फ्रेंडली बाप्पा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रथम पारितोषिक  ५००० रु, द्वितीय पारितोषिक ३००० रु, व तृतीय २००० रु अशी आकर्षक बक्षीसे ठेव्यात आली आहे स्पर्धेत भाग घेण्यासाठी नगरपंचायत मध्ये संपर्क साधावा असे आवाहन नगरपंचायतच्या वतीने करण्यात आले आहे.

 दरवर्षी प्रमाणे यंदाही कसई दोडामार्ग नगरपंचायतच्या माध्यमातून पर्यावरण फ्रेंडली बाप्पा तालुका स्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. भाग घेणाऱ्या स्पर्धकाने पर्यावरण पूरक सजावट स्वछता पूर्ण जनजागृती संदेश, ध्वनी प्रदूषण विरहित संदेश, माझी वसुंधरा पाणी वाचवा, मुलगी वाचवा, कचरा विलगीकरण, स्वच्छतेचे संदेश अशा प्रकारे सजावट देखावे करावे तसेच ०७ सप्टेंबर पासून ते १४ सप्टेंबर पर्यंत नाव नोंदणी करावी 
असे आवाहन नगरपंचायतच्या वतीने करण्यात आले आहे.