LIVE UPDATES

सिंधुदुर्गातील उबाठा शिवसेनेचे डीजी कक्ष पदाधिकारी जाहीर

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 04, 2026 19:53 PM
views 44  views

कणकवली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या डीजी कक्ष (सोशल मिडीया) नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.‌ नूतन पदाधिकाऱ्यांचे शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी अभिनंदन केले आहे.

नूतन पदाधिकारी 
अमर घाडी - सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक, प्रसाद रेवडेकर - कुडाळ विधानसभा समन्वयक, विठोबा गुरव - कणकवली विधानसभा समन्वयक, विनय कदम - कुडाळ तालुका समन्वयक, प्रसाद गावडे - कुडाळ तालुका सहसमन्वयक, तपस्वी मयेकर - मालवण तालुका समन्वयक, श्रीधर सावंत - कणकवली तालुका समन्वयक, लोकेश माणगावकर - देवगड तालुका समन्वयक, गुलझार काझी - वैभववाडी तालुका समन्वयक, ओंकार पंडित - वेंगुर्ले तालुका समन्वयक, सिद्धेश कासार - दोडामार्ग तालुका समन्वयक.