LIVE UPDATES

शिरोडा वेळागर येथील ताज प्रकल्प ठरलेल्या जागेतच होणार : नितेश राणे

सर्व्हे नं वागळण्याबाबत वेगळे पत्र दिले जाईल
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 05, 2026 19:07 PM
views 25  views

वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा वेळागर येथील पंचतारांकित ताज प्रकल्प बी-वन मध्ये पब्लिक नोटीसमध्ये ज्या सर्व्हे नंबरमध्ये करायचे ठरवले आहे. त्याच भागात हा प्रकल्प करण्यात येणार आहे. अन्य भागात प्रकल्पाचे काम केले जाणार नाही असा ठाम विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी आज वेंगुर्ले येथे झालेल्या बैठकीत व्यक्त केला.

यावेळी सर्व्हे नंबर ३९ संघर्ष समितीच्या सदस्यांनी आभार मानले असून त्यांनी आपला ताज प्रकल्पाला विरोध नाही असे स्पष्ट केले आहे. या बैठकीला आमदार दीपक केसरकर, एमटीडीसीचे दीपक माने, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप जिल्हाद्यक्ष प्रभाकर सावंत, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष पपू परब, जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, पं. स. सभापती शंकर घारे, उपसभापती सचिन देसाई आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

याबाबत एमटीडीसीने शासन स्तरावर सांगितलेली माहिती लेखी स्वरूपात या संघर्ष समितीला देण्यात आली. तर एकूण एमटीडीसीच्या जागेपैकी ताज प्रकल्पाला देण्यात आलेल्या जागेतच हा प्रकल्प होईल. अतिरिक्त सर्व्हे नं ३९ व वेळागरवाडी सर्व्हे नंबरची जी जागा आहे ती वगळण्याबाबत वेगळे पत्र दिले जाईल असेही पालकमंत्री यांनी यावेळी स्पष्ट केले.

याबाबत आपण व आमदार केसरकर याचा पाठपुरावा करणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी संघर्ष समितीचे नेते जयप्रकाश चमणकर, तसेच आजू आमरे, राजू आंदुर्लेकर व अन्य सदस्य उपस्थित होते. येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्लाच्या सभागृहात ही बैठक पार पडली.