LIVE UPDATES

Nilesh Rane : राजकारणाच्या पलीकडचा ‘माणगाव पॅटर्न

विकासासाठी एकत्र येण्याची आमदार निलेश राणे-दत्ता सामंत यांची कार्यसंस्कृती
Edited by: भरत केसरकर
Published on: November 05, 2026 09:54 AM
views 60  views
Nilesh Rane inaugurating the newly constructed school mandap at St Joseph Primary School in Mangaon, Sindhudurg.

सिंधुदुर्ग : राजकारण म्हणजे केवळ कुरघोडी, एकमेकांचे पाय खेचणे आणि जाहीर सभांमधून चिखलफेक करणे, असेच समीकरण आजकाल सर्वत्र पाहायला मिळते. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील दरी इतकी रुंदावली आहे की, सामाजिक हिताच्या प्रश्नांवरही राजकीय पक्ष आमनेसामने ठाकलेले दिसतात. अशा गढूळ राजकीय वातावरणात कोकणातील माणगावमधून आलेली एक बातमी केवळ सुखद धक्का देणारी नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा दाखवणारी ठरली आहे.

ठाकरे सेनेचे कुडाळ तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य रमाकांत तामाणेकर यांनी केलेली मागणी आणि शिवसेनेचे आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दाखवलेली तत्परता ही निखळ समाजकारणाची आणि परिपक्व नेतृत्वाची उत्तम चुणूक आहे.माणगाव येथील सेंट जोसेफ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सभामंडपाची गरज होती.

ऊन-पावसापासून चिमुकल्यांचे रक्षण व्हावे, त्यांच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना हक्काचे छत मिळावे, हा यामागचा शुद्ध हेतू होता. यासाठी रमाकांत तामाणेकर यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांना केवळ एक साधा फोन केला. विरोधकांचा फोन आला म्हणून विषयाला बगल देणे किंवा ‘पाहू, करू’ अशी चालढकल करणे सहज शक्य होते. मात्र, सामंत यांनी क्षणाचाही विलंब न लावता ही बाब आमदार निलेश राणे यांच्या कानावर घातली.

​येथे खरी कसोटी होती ती नेतृत्वाच्या दृष्टीची. निलेश राणे यांनी कुठलाही राजकीय अभिनिवेश न बाळगता, तात्काळ स्वतःच्या माध्यमातून पाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. आज माणगावच्या त्या शाळेत सभामंडप केवळ पाच दिवसांत दिमाखात उभा राहिला आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा शिवसेपेचे कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे,शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत,माजी जि.प.सदस्य रमाकांत तामाणेकर,सरपंच मनिषा भोसले,माजी प्राचार्य वि.न.आकेरकर,सभापती मिलिंद नाईक माजी जि.प.अध्यक्ष काका कुडाळकर,संजय पडते,माजी सरपंच सचिन धुरी,शिवसेना शहरप्रमुख दत्ता कोरगावकर यांच्यासह शिवसैनिक,पालक आणी ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

हा प्रसंग केवळ पाच लाखांच्या निधीचा किंवा एका पत्र्याच्या मंडपाचा नाही, तर त्यामागील ‘मोठ्या मनाचा’ आहे.विरोधकांचा आदर नेहमीच राणे कुटुंबीय करत आलय.विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधीने केलेल्या जनहिताच्या मागणीला दुजाभाव न दाखवता तत्काळ न्याय देणे, हे खऱ्या ‘कार्यसम्राट’ नेतृत्वाचे लक्षण आहे.

​शिक्षणाला प्राधान्य देण्याचे राणेःचे नेहमीच प्रयत्न राहिलेत. राजकीय मतभेद बाजूला ठेवून चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हात पुढे करणे ही खरी समाजसेवा ठरते.

​कार्यक्षम समन्वय जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि आमदार निलेश राणे यांच्यातील तातडीचा समन्वय कामाचा आदर्श दर्शवतो.​राजकारणात निवडणुका येतील आणि जातील; जय-पराजय होत राहतील. परंतु, आपल्या भागातील जनतेचे, विशेषतः नव्या पिढीचे भविष्य घडवताना राजकीय सीमा ओलांडून एकत्र येणे हीच खरी लोकशाहीची ताकद आहे. निलेश राणे आणि दत्ता सामंत यांनी विरोधकांना सोबत घेऊन विकासाचा मार्ग कसा चोखाळायचा, याचा एक नवा वस्तुपाठच घालून दिला आहे.

​माणगावच्या सेंट जोसेफ शाळेतील हा सभामंडप केवळ ऊन-पावसापासून सावली देणार नाही, तर कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक निकोप, सुसंस्कृत आणि सर्वसमावेशक विकासाचे एक प्रेरणादायी प्रतीक म्हणून कायम उभा राहील.


ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
Sawantwadi News : 'द बॉबीन डिझाईनर स्टुडिओ'चा सावंतवाडीत शुभारंभ
November 05, 2026
Fly91 daily flight service between Sindhudurg Chipi Airport and Navi Mumbai starting November 16, 2026.
Sindhudurg to Navi Mumbai Flight : सिंधुदुर्ग-नवी मुंबई विमानसेवेचे बुकिंग सुरू
November 05, 2026
दशावतार ही कोकणची शान, कोकणसादने या कलेला जागतिक व्यासपीठ दिले
November 05, 2026
MLA Nilesh Rane meets villagers protesting over the Pazar lake issue in Kudal and directs authorities to stop the developer's work.
ग्रामस्थांच्या मागण्या मान्य होईपर्यंत विकासकाचे काम थांबवण्याचे आदेश
November 05, 2026
संबंधित बातम्या

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
Sawantwadi News : 'द बॉबीन डिझाईनर स्टुडिओ'चा सावंतवाडीत शुभारंभ
November 05, 2026
दशावतार ही कोकणची शान, कोकणसादने या कलेला जागतिक व्यासपीठ दिले
November 05, 2026
MLA Nilesh Rane meets villagers protesting over the Pazar lake issue in Kudal and directs authorities to stop the developer's work.
ग्रामस्थांच्या मागण्या मान्य होईपर्यंत विकासकाचे काम थांबवण्याचे आदेश
November 05, 2026
Sindhudurg Zilla Parishad Education Committee meeting discussing 13 vacant graduate teacher posts and pending education issues.
सिंधुदुर्गात पदवीधर शिक्षकांची १३ रिक्त पदे ज्येष्ठतेनुसार भरणार
November 05, 2026